म्हैसूरला मिळाला नवा राजा; वय 23 वर्षं, शिक्षण बीए !

May 28, 2015 2:04 PM0 commentsViews:

MASSORE28 मे : राजवाडे आता संपले आहेत पण राजपरिवार आपली परंपरा आजही जोपासत आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे म्हैसूर संस्थानला नवा राजा मिळालाय. म्हैसुरच्या आंबा विलास पॅलेसमध्ये या नव्या राजाचा राज्याभिषेक करण्यात आला. 23 वर्षांच्या राजाचं नाव यदूविर कृष्णदत्त वाडियार आहे.

म्हैसुरच्या राजघराण्याचे शेवटचे वंशज श्रीकांत वाडियार यांच्या पत्नींनं यदूविर यांना दत्तक घेतलंय. आज 40 पंडितांच्या उपस्थित भव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. विशेष म्हणजे नवा राजा यदूविर कृष्णदत्त वाडियार बोस्टन विद्यापीठात इकोनॉमिक्समध्ये बीए केलंय.

राज्याभिषेक सोहळ्याला देशभरातले 1200 राजघराण्यातल्या व्यक्ती उपस्थित होत्या. राज्यभिषेकानंतर बलराम नावाच्या हत्तीवरुन राजाची मिरवणूकही काढण्यात आली होती. 1399 ते 1950 पर्यंत वाडियार राजघराण्यानं मैसूरवर राज्य केलंय.

श्रीकांत दत्त नरसिंह राजा यांच्या मृत्यू 10 डिसेंबर 2013 ला झाला होता. त्यानंतर आज म्हैसूरला नवा राजा मिळाला. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव बुधवार ते शुक्रवारपर्यंत पर्यटकांसाठी राजवाड्यावर बंदी करण्यात आलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close