सलमानच्या फुटपाथ अपघात प्रकरणाच्या फाईली मंत्रालयाच्या आगीत जळाल्या !

May 28, 2015 3:50 PM0 commentsViews:

salman hit run file mantralaya28 मे : फुटपाथ अपघात प्रकरणी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवण्यात आलं पण, झटपट त्याला जामीनही मिळाला आणि शिक्षेवर स्थगितीही मिळाली. पण, आता या प्रकरणातील काही फाईल मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळून खाक झाल्यात अशी धक्कादायक माहिती उजेडात आलीये. माहिती अधिकारांतर्गत राज्य सरकारने हा खुलासा केलाय.

2002 साली सलमान खानने बेदरकारपणे गाडी चालवून एकाचा बळी घेतला होता. मुंबई सेशन्स कोर्टाने सलमानला या प्रकरणी दोषी ठरवलं. सलमानने हायकोर्टात धाव घेतली असता कोर्टाने दिलासा देत शिक्षेवर स्थगिती दिली. सलमानच्या शिक्षेवर स्थगिती मिळाल्यामुळे जनमानसात संताप व्यक्त आहे. सलमानच्या या खटल्यात राज्य सरकारने किती खर्च केला,किती वकिलांची नियुक्ती केली याबद्दलची माहिती अधिकार कार्यकर्ते मन्सूर दुर्वेश यांनी माहिती अधिकारीतून विचारली.

या प्रकरणाची फाईल 21 जून 2012 मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळून गेल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलंय. फाईल जळाल्यामुळे या प्रकरणाची माहिती देणे शक्य नसल्याचं या उत्तरात म्हटलंय. फक्त सप्टेंबर 2014 पासून प्रदीप घरत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याबाबतची माहिती देण्यात आलीये. उद्या जर राज्य सरकारला या खटल्यात काही कागदपत्र सादर करायची ठरल्यास सरकार काय करणार असा प्रश्न दुर्वेश यांनी उपस्थित केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close