उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी हे करा, हे करू नका !

May 28, 2015 4:31 PM0 commentsViews:

heat wave28 मे : देशभरात उष्णतेची लाट आलीये. उन्हाचा पारा वाढल्यामुळे जीवाची काहिली होतेय. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघातामुळे मृतांचा आकडा 1400 वर पोहचलाय. महाराष्ट्रातही विदर्भ, मराडवाडा, खान्देश उन्हाने तापलाय. अशा कडाक्याच्या उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी या काही टीप्स….

उष्माघाताची लक्षणे
गरम, कोरडी त्वचा किंवा अति घाम येणे
अचानक थंडी वाजून येणे
डोकेदुखी
धडधडणे
चक्कर येणे

उष्माघातावर उपचार
उन्हातून सावलीच्या ठिकाणी जा आणि आराम करा
शक्य असल्यास एसी रुममध्ये आराम करा
किंवा थंड, सावली असलेली जागा निवडा
भरपूर पाणी प्या
थंड पाण्यानं आंघोळ करा
पंखा लावा किंवा आईस टॉवेल्सचा वापर करा
30 मिनिटांच्या आत आराम न पडल्यास डॉक्टरकडे जा

हे करा
-उन्हाच्या वेळेस शक्यतो घरामध्येच रहा…बाहेर पडायचे असल्यास सोबत पाणी नक्की ठेवा
- सतत पाणी प्या
-दिवसभरात कमीत कमी 4 लीटर पाणी तरी प्या
-बाहेरचे खाणे शक्यतो टाळा, घरी तयार केलेले पदार्थच खा
-तुमच्या जेवणातही पातळ पदार्थांचा जास्त समावेश करा
-कलिंगड, खरबूज, काकडी सारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आणि भाज्या खा
-लिंबू सरबत किंवा संत्रा ज्यूस घ्या
-दिवसातून दोनदा अंघोळ करा
- हलक्या रंगाचे कॉटनचे कपडे वापरा
-उन्हात फिरताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा
-खूप ताप, चक्कर येत असेल किंवा उलट्या होत असतील तर ताबडतोब डॉक्टरकडे जा

हे करू नका

-जंक फूड आणि
-शिळे अन्न खाऊ नका
-सिंथेटीक कपडे वापरू नका
-दुपारच्या वेळेस थेट सूर्यकिरणे डोक्यावर येतील अशा ठिकाणी थांबू नका

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close