बोपखेलचा सध्याचा रस्ता खुला करता येणार नाही -पर्रिकर

May 28, 2015 5:56 PM0 commentsViews:

parikar on bopkhel28 मे : बोपखेलचा सध्याचा जो रस्ता आहे तो खुला करता येणार नाही असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केलंय. पण त्या रस्त्याला पालिकेनं तीन पर्यायी रस्ते सुचवले आहे. त्या तीन पर्यायांपैकी मुळा नदीवर पूल बांधुन देण्याचा पर्याय हा सर्वात सोयीस्कर असल्याचं नागरीक आणि प्रशासनाचं एकमत होण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवडच्या बोपखेल प्रश्नी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज (गुरुवारी) पुण्यात बैठक घेतली. या बैठकीला पुण्याचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते. संरक्षण विभागानं बोपखेलमधला रस्ता बंद केल्यानं ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. गेल्या आठवड्यात लष्कर आणि ग्रामस्थांमध्ये तुफान संघर्ष झाला होता. याची पर्रिकरांनी दखल घेतली आणि आज बैठक बोलावली.

या बैठकीत सध्याच्या रस्त्यावर मधला मार्ग काढण्यावर चर्चा झाली. मुळा नदीवर पूल बांधण्यावर भर देण्यात आलाय. याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. उद्या याबाबतचा निर्णय जिल्ह्याधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत होणार आहे. नदीवर पुल बांधण्याचा पर्याय स्वीकारला तर लष्कर नदीवर तात्पुरता पुल बांधुन देणार आहे. आणि त्यानंतर महानगरपालिका त्या पुलाचं काम हाती घेईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close