वस्त्रहरणचा 5000 वा प्रयोग

November 5, 2009 10:29 AM0 commentsViews: 2

5 नोव्हेंबर वस्त्रहरण नाटकाचा 5000 वा प्रयोग 21 नोव्हेंबरला मुंबईतल्या षण्मुखानंद नाट्यगृहात होणार आहे. या विक्रमी प्रयोगाचं वैशिष्ठ्यं म्हणजे या 5000व्या प्रयोगात सध्याचे मराठीतील आघाडीचे नट सहभागी होणार आहेत. या प्रयोगात भरत जाधव, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर असे आघाडीचे नट प्रयोगात काम करणार आहेत. 1985 साली मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरणच्या इंग्लंड दौर्‍याला साहाय्य व्हावं म्हणून केलेल्या प्रयोगातही त्यावेळचे आघाडीचे कलाकार काशिनाथ घाणेकर, राजा गोसावी, नाना पाटेकर सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे 5000 व्या प्रयोगाला आत्ताचे आघाडीचे कलाकार सहभागी होणार आहेत. अश्याप्रकारे वस्त्रहरण नाटकाचे 5000 प्रयोग पूर्ण व्हावेत ही मच्छिंद्र कांबळी यांची इच्छा पूर्ण होणार असल्याच विश्वास मच्छिंद्र कांबळी यांचा मुलगा प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केला.

close