पोलीस स्टेशनमध्ये 2 मॉडेल्सचा धिंगाणा, महिला कॉन्स्टेबलशी केली धक्काबुक्की

May 28, 2015 7:59 PM0 commentsViews:

puja mishra28 मे : बॉलीवूडच्या चकाचक दुनियेत बेफाम झालेल्या दोन मॉडेल्सनी पोलीस स्टेशनमध्येच गोंधळ घातलाय. त्यांचा हा प्रताप कॅमेर्‍यात कैद झालाय. पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता या दोन मॉडेल्सनी डी एन नगरच्या पोलीस स्टेशनमध्ये अर्वाच्य भाषेत राडा घातला. एवढंच नाहीतर या मॉडेल्सनी महिला कॉन्स्टेबलला मारहाणही केली. या प्रकरणी दोन्ही मॉडेल्सवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

घडलेली हकीकत अशी की, पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता या दोघी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधल्या घरी जात असताना अंधेरी पश्चिमेच्या एका एटीमजवळ त्या थांबल्या होत्या. यावेळी ऑडी कारमध्ये बसलेल्या दोन तरुणांशी त्यांची बाचाबाची झाली. हे दोन्ही तरुण आपल्याबद्दल असभ्य भाषेत बोलत असल्याचा या तरुणींचा आरोप आहे. हा सगळा प्रकार सुरू असताना तिथे आलेल्या पोलिसांना पाहून हे तरुण तिथून फरार झाले.

पोलिसांनी या मॉडेल्सना डी एन नगर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेलं. पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला नेण्यात आलं याचा राग धरून दोन्ही मॉडेलनी पोलीस स्टेशनमध्ये एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांशी बाचाबाची सुरू केली. आम्हाला त्या ऑडीतील तरूणांनी छेड काढली त्याना तुम्ही पळू दिलं, त्यांना अगोदर अटक करा असा आकाडतांडव सुरू केली.

काही वेळानं पोलिसांनी संबंधित तरुणांनाही हजर केलं. पण तेव्हा या दोघींनी त्यांना ओळखायला नकार दिला. पाऊण तास चाललेल्या या प्रकारातला कहर म्हणजे तिथल्या महिला कॉन्स्टेबललाही या दोघींनी विनाकारण मारहाण केली. झालेल्या प्रकारामुळे पूजा मिश्रा आणि श्रुती गुप्ता या दोघींवर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close