पोलिसांच्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू ?

May 28, 2015 9:58 PM0 commentsViews:

nagar poilce3428 मे : अहमदनगरचे पोलीस संरक्षक आहेत का हैवान असा प्रश्न आता पडलाय. कारण पोलिसांनी केलेल्या मारहाणीत नितीन साठे या संशयित आरोपीचा मृत्यू झालाय असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय.

नितीन साठेला खासगी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे त्याच्यावर पुढचे उपचार थांबवण्यात आले होते.

नितीन मंगळवारी रात्री त्याच्या काही मित्रांसह बस स्थानक परिसरात फिरत होता. त्यावेळी कोतवाली पोलिसांनी त्याला संशयित म्हणून पकडलं. त्यावेळी नितीनचे इतर मित्र पळून गेले.

त्यानंतर काल नितीन हा चौकशी सुरू असताना कोतवाली पोलीस ठाण्यातून विवस्त्र अवस्थेत पळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून बेदम मारहाण केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. तर नितीन पळताना जखमी झाला असा पोलिसांचा दावा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close