टॅक्सवसूलीत वाढ

November 5, 2009 12:34 PM0 commentsViews: 2

5 नोव्हेंबर देशातल्या टॅक्सवसूलीत यंदा भरघोस वाढ झाली आहे. सरकारनं नुकतीच ही टॅक्स कलेक्शनची आकडेवारी जाहीर केली. देशातल्या पर्सनल, डायरेक्ट तसेच कॉर्पोरेट टॅक्स कलेक्शनमध्येवाढ झाल्याचं दिसतंय. पर्सनल टॅक्स कलेक्शनमध्ये 2.87 टक्के वाढ झाली असून. एकूण 63 हजार 195 लाख कोटी पर्सनल टॅक्स जमा झाला आहे. 1.73 लाख कोटी डायरेक्ट टॅक्स यावर्षी जमा झाला. त्यातही 3.92 टक्के इतकी वाढ झाली. कॉर्पोरेट इंडस्ट्रीकडून मिळणारा टॅक्सही यावर्षी सुमारे 5 टक्क्यांनी वाढलाय. एकूण 1.09 लाख कोटी रुपये टॅक्स कॉर्पोरेट जगतानं भरला.

close