दिल्ली विमानतळावर किरणोत्सारी पदार्थाच्या गळतीमुळे घबराट

May 29, 2015 1:43 PM0 commentsViews:

igibig29 मे : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळावर किरणोत्सारी पदार्थाची गळती झाल्यामुळे खळबळ उडालीये. तुर्कीवरून आलेल्या कार्गो विमानातून किरणोत्सारी पदार्थाला सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असताना ही गळती झाली. एनडीआरएफ आणि अणू ऊर्जा विभागाचं पथक लगेचंच घटनास्थळी दाखल झालं. त्यांना ही गळती थांबवण्यामध्ये यश आलंय.

आज सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास तुर्की एअरलाईन्सचं विमान आईजीआई विमानतळावर पोहचलं. सोडियम आयोडाईडच्या 7 व्या श्रेणीचं या किरणोत्सारी पदार्थाची गळती झाल्याचं लक्षात आलं. गळती झाल्यामुळे कर्मचार्‍यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागल्यामुळे धावपळ उडाली. एनडीआरएफ आणि अणू ऊर्जा विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन गळती आटोक्यात आणलीय. दिल्ली विमानतळावरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं गृहमंत्रालयाकडूनही सांगण्यात आलंय. फोर्टिस हॉस्पिटलनं न्यूक्लिअर मेडिसीन विभागासाठी तुर्कीवरून हा किरणोत्सारी पदार्थ मागवण्यात आला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close