गवळीच्या पॅरोलमध्ये पुन्हा वाढ, 12 जूनपर्यंत जेलबाहेरच

May 29, 2015 4:04 PM0 commentsViews:

gavali 234452329 मे : गँगस्टर अरुण गवळी याला पुन्हा सलग दुसर्‍यांदा पॅरोल वाढवून मिळालाय. नागपूर हायकोर्टाने अरूण गवळीच्या पॅरोलमध्ये 12 जूनपर्यंत वाढ केलीय. आईच्या आजारपणासाठी त्याला हा पॅरोल वाढवून मिळालाय.

गवळीच्या 80 वर्षांच्या आईच्या गुडघ्यावर येत्या 10 तारखेला शस्त्रक्रिया होणार आहे. याच कारणासाठी गवळीला ही सुट्टी वाढवून मिळालीय. गेल्या 5 मे रोजी नागपूर जेलमधून गवळी मुलाच्या लग्नासाठी जेलबाहेर आला होता. तेव्हापासून तो जेलबाहेरच आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close