‘मॅगी’मुळे माधुरी दीक्षित अडचणीत, FDA बजावली नोटीस

May 29, 2015 4:31 PM0 commentsViews:

madhuri maggi add29 मे : वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या मॅगीमुळे धकधक गर्ल माधुरी दीक्षित अडचणीत सापडलीये. माधुरीने मॅगीची जाहिरात केली होती. या जाहिरातीबद्दल हरिद्वार अन्न आणि औषध विभागानं माधुरीला नोटीस बजावलीय. या नोटिसाला 15 दिवसांत माधुरीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत. जाहिरातीत दाखवण्यात आलेल्या मॅगीच्या पोषक मूल्यांबाबत अन्न आणि औषध विभागानं साशंकता व्यक्त केलीये.

काही दिवसांपूर्वी कोलकात्याच्या लॅबमध्ये मॅगीच्या सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली होती आणि यामध्ये MSG आणि लेडचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय. त्यामुळेच लखनौच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यामुळे मॅगी बाजारातून परत मागवण्यात आली. तर दुसरीकडे माधुरी दीक्षितने मॅगीच्या जाहिरातीत मॅगी खाल्यामुळे तीन पोळ्यांइतकं फायबर मिळतं आणि तुम्ही ‘फिट’ राहता, असा संदेश तिनं या जाहिरातीतून दिलाय. या जाहिरातीमुळेच हरिद्वार अन्न आणि औषध विभागानं माधुरीला नोटीस बजावलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close