नितीन साठे खून प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 4 कर्मचारी निलंबित

May 29, 2015 6:42 PM0 commentsViews:

nitin sathe29 मे : अहमदनगरमधल्या नितीन साठे खून प्रकरणी प्राथमिक चौकशीत एक पोलीस उप निरीक्षक आणि चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. संशयित असलेल्या नितीन साठेचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.

वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्याचं आश्वासन गृह राज्यमंत्री राम शिंदेंनी दिलंय. तर या प्रकरणाची जबाबदारी सीआयडीकडे सोपणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close