प्रभा अत्रे पालिकेवर नाराज, ‘स्वरभास्कर’ नाकारला

May 29, 2015 8:00 PM0 commentsViews:

prabha atre 43529 मे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांनी स्वरभास्कर पुरस्कार नाकारलाय. ‘स्वरभास्कर’ हा पुरस्कार पुणे महापालिकेकडून दिला जातो. मात्र, प्रभा अत्रे महापालिकेवर नाराज आहेत.

प्रभा अत्रे यांनी पुरस्कार स्विकारण्यासाठी अटी घातल्या होत्या. ही बाब महापालिकेनं जाहीर सांगितल्यानं अत्रे नाराज झाल्याचं समजतंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर किंवा न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यातर्फे सत्कार करावा अशी मागणी प्रभा अत्रे यांनी केली होती.

तसंच स्वतःच्या संस्थेतर्फे कार्यक्रम करण्यात यावा आणि त्यासाठी 75 हजारांचं मानधन द्यावं अशी मागणी प्रभा अत्रे यांनी केली होती. त्यांच्या मागण्या पालिकेनं जाहीर केल्यामुळे अत्रेंनी नाराजी व्यक्त करत पुरस्कार नाकारलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close