पुण्यात H1N1 चा 100 वा बळी

November 5, 2009 12:38 PM0 commentsViews:

5 नोव्हेंबर पुण्यात H1N1 च्या पेशंटचा गुरूवारी आणखी एक बळी गेला. त्यामुळे पुण्यातल्या H1N1 च्या बळींचा आकडा आता 100 झाला आहे. पुण्यातल्या नोबेल हॉस्पिटलमध्ये मोहिनी उंदरे या महिलेचा मृत्यू झाला. त्यांचा गुरूवारी पहाटे साडेचार वाजता मृत्यू झाला. बुधवारी रात्री पावणे नऊ वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आतापर्यंत पुण्यात 6 लाख 70 हजार लोकांची H1N1 ची तपासणी करण्यात आली आहे . बुधवारी 5 हजार लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 10 जणांची टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. 420 जणांना टॅमिफ्लूचे डोस देण्यात आलेत. तर एकूण 37 हजार 357 लोकांना टॅमिफ्लू देण्यात आलं.

close