सचिनने गाठले 17 हजार

November 5, 2009 1:49 PM0 commentsViews: 1

5 नोव्हेंबर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे करियरमध्ये 17 हजार रन्सचा टप्पा पार केला आहे. आपल्या वीस वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दित सचिन तेंडुलकर तब्बल 435 वन डे मॅच खेळत त्याने हा रेकॉर्ड केला. मोहाली वन डेतच सचिन हा रेकॉर्ड पूर्ण करणार होता. पण अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे सचिन 40 रन्सवर आऊट झाला. या वन डेत मात्र त्याने क्रिकेटफॅन्सची निराशा केली नाही. 17 हजार रन्सचा टप्पा पार करणारा सचिन हा क्रिकेट जगतातील एकमेव बॅट्समन ठरलाय. क्रिकेटमधले जवळपास सर्व रेकॉर्ड सचिनच्या नावावर जमा आहे.

close