दगडी चाळीत गुंडगिरी सुरूच, सेना शाखाप्रमुखांचं केलं होतं अपहरण?

May 29, 2015 10:35 PM0 commentsViews:

anil kuche4429 मे :  उल्हासनगर परिसरातील शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि व्यवसायिक अनिल कुंचे याचं अपहरण करुन कुख्यात डॉन अरुण गवळीच्या  दगडी चाळीत आणण्यात आलं होतं अशी धक्कादायक माहिती उजेडात आलीये. एवढंच नाहीतर कुंचे यांच्याकडून 60 लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आलीय जर पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर याचे गंभीर परिणास तुला भोगावे लागतील अशी धमकी अरुण गवळीच्या माणसांनी दिली असल्याचा आरोप या व्यावसायिकांनी केलाय. यासंदर्भात उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला असून यातील सर्व आरोपी फरार आहेत.

उल्हासनगर येथील शिवसेना शाखाप्रमुख अनिल कुंचे उर्फ लाल्या याचे अरुण गवळीच्या लोकांनी 15 मे रोजी अपहरण केले होतं. कुंचे यांना दगडी चाळीत नेऊन 60 लाखाची खंडणीही मागितली होती. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात राम वाधवा, नंदू वाधवा, मनोज परदेशी, आणि विजू गवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अध्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

अनिल कुंचे ऊर्फ लाल्या याची उल्हासनगर गाऊन बाजार येथे काही दुकान असून त्यात कनोजिया नावाचं परिवार राहतं, ते रूम खाली करत नसल्याने अनिल कुंचे आणि त्यांच्या वाद सुरू आहे. त्यात गेल्या महिन्यात राम वाधवा, नंदू वाधवा आले आणि त्यांनी अरुण गवळीच्या नावाने त्याला धमकाविण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपीवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला असून अद्याप कुणालाही याप्रकरणात अटक केलेली नाही

मात्र, याप्रकरणी आरोपी असणारे राम वाधवा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपल्यावर हा सपशेल खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून आपण गरीब कनोजिया परिवारास त्यांचे दुकान परत मिळून देण्यासाठी मदत करीत आहोत म्हणून आणि पोलीस सुरक्षा मिळविण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close