शेतकर्‍यांसाठी लोकशाहीच्या मार्गानं आवाज उठवावा लागेल -पवार

May 30, 2015 1:21 PM0 commentsViews:

Sharad Pawar on tobacco30 मे : वेळ पडली तर लोकशाहीच्या मार्गानं आवाज उठवावा लागेल, असा इशारा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलाय. शरद पवार मराठवाड्यात आजपासून दुष्काळी दौर्‍यावर आहेत.

त्यांनी चित्ते पिंपळगावमध्ये शेतकर्‍यांशी संवाद साधला. ते औरंगाबादमधल्या एकतूणी गावात शेतकर्‍यांची भेट घेतील. मरावाड्यातल्या शेतकर्‍यांना यंदा दुष्काळाचा फटका बसला. अनेक शेतकर्‍यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शरद पवारांनी चित्ते पिंपळगावमध्ये शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळेस शेतकर्‍यांनी त्यांच्या व्यथा पवारांसमोर मांडल्या. तुम्ही तरी ऐकून घ्या असं आर्जवचं शेतकर्‍यांनी घातलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close