23-20 फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

November 6, 2009 7:45 AM0 commentsViews:

6 नोव्हेंबर 23-20च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करत अखेर शनिवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा दिल्लीत केली. चर्चेनंतर काँग्रेसच्या वाट्याला 23 मंत्रिपदं आली आहेत. तर राष्ट्रवादीकडे 20 मंत्रीपद आल्याचंही त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यावर पंधरा दिवसांनी आघाडीमध्ये खातेवाटपाबद्दल एकमत झालं आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यपालांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या गटनेत्यांना लवकरात लवकर सरकार स्थापन करण्यास सांगितलं होतं.

close