टोलमधून आता स्कूलबसलाही मिळणार सूट

May 30, 2015 4:28 PM0 commentsViews:

toll bus free30 मे : राज्यात 12 टोल कायमचे बंद करण्यासाठी अध्यादेश जारी केला आहे. पण, आता स्कूलबसवरचा टोल माफ करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीये.

लवकरच सुधारित परिपत्रक काढण्यात येईल. राज्यात लवकरच स्कूल बसना टोल माफ करणार, येत्या आठ ते दहा दिवसांत अध्यादेश ही काढण्यात येईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीये. त्यामुळे संस्थाचालकांना मोठा दिलासा मिळालाय.

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात 12 टोल नाके कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसंच 31 टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेसना टोलमधून सूट मिळणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील उर्वरीत 19 प्रकल्पावरुल 26 टोल नाके, राज्य रस्ते विकास महामंडळाडील 12 प्रकल्पावरील 26 पथकर नाके, अशा 53 टोल नाक्यावर कार, जीप आणि एसटीला 31 मेच्या मध्यरात्री टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. आता स्कूलबसला यातून वगळण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close