पावसाळ्यात फोनचं नो टेन्शन, वापरा ब्ल्यूटूथ छत्री !

May 30, 2015 7:15 PM0 commentsViews:

bluetwoth umbrela30 मे : मान्सून आता बंगालच्या उपसागरात येऊन ठेपलाय आणि काही दिवसातच घराघरात आतापर्यंत ठेवणीत ठेवलेल्या छत्र्या बाहेर यायला सुरुवात होईल. सध्या तिरुअनंतमच्या बाजारात एका हायटेक छत्रीने लक्ष वेधून घेतलं. ही आहे मोबाईल फ्रेंडली छत्री.

ही छत्री तुमच्या मोबाईलशी कनेक्टेड असेल, त्यामुळे भर पावसात तुम्ही छत्री घेऊन उभे आहात आणि फोन आला तर तारांबळ उडण्याचं कारण नाही. छत्रीला असलेल्या बटनाच्या साहाय्याने तुम्हाला फोन वापरता येणार आहे.

फक्त तुमच्या फोनला ब्ल्यूटूथ किंवा वाय फायची सोय हवी की मग भर पावसात फोनवर बोलताना किंवा गाणी ऐकताना तुम्हाला या छत्रीच्या वापर करता येईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close