‘मॅगी’ची प्रत्येक राज्यात होणार ‘टेस्ट’ !

June 1, 2015 1:40 PM0 commentsViews:

maggi 34 01 जून : वादाच्या भोवर्‍यात सापडलेली मॅगीवर कदाचित देशभरात बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. अन्न सुरक्षा प्राधिकरणानं सर्व राज्यांना त्यांच्या मार्केटमध्ये असलेले मॅगीचे नमुने गोळा करायला सांगितलं आहे.

हे नमुने गोळा करण्याचे निर्देश लेखी देण्यात आलेत. दिलेले निर्देश कंपनीकडून पाळले जातायेत की नाही याबद्दलची ही टेस्ट असणार आहे. याबाबतचे आदेश गेल्या आठवड्यात काढण्यात आला होता.

महाराष्ट्रातल्या विविध शहरांमधून मॅगीचे नमुने गोळा करण्यात आलेत आणि याबाबतचा अहवाल उद्या देणे अपेक्षित आहे. तर याप्रकरणी उत्तर प्रदेशाच्या एका स्थानिक न्यायालयात नेस्टले कंपनीविरोधात खटला दाखल आहे.

मॅगीमध्ये परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा 17 टक्के जास्त शिसे आढळले होते. त्यानंतर हा खटला दाखल करण्यात आलाय. या खटल्यानंतर देशातील काही भागातील बाजारातून मॅगी परत मागवण्यात आली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close