अखेर टोल धाड बंद, सेना-भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

June 1, 2015 2:08 PM0 commentsViews:

toll band 3301 जून : अखेर रविवारी मध्यरात्रीपासून राज्यात काही टोलनाक्यांवरची बंदी, आणि काही टोलनाक्यांवर अंशत: टोलबंदी लागू झालीये. 12 टोलनाके पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तर 53 टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसला टोलमाफी सुरू झालीये. शुक्रवारी राज्य सरकारनं यासंबंधीची अधिसूचना काढली होती. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. 10 एप्रिलला विधानसभेत हा निर्णय सरकारनं जाहीर केला होता.

खामगावजवळचा टोलनाका बंद

मंुबई नागपूर महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यातील खामगावजवळचा टोलनाका बंद करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून या टोलवर सर्वच 4 चाकी गाड्यांची टोलवसुली करण्यात येत होती. यामुळे दररोज लाखोंवर ही वसुली होती. पण शासनाच्या टोलबंदीच्या निर्णयाने आता ती वसुली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे इथं होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. सरकारच्या या निर्णयाचं प्रवाशांनी स्वागत केलं.

सेना-भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

आजपासून काही अंशी टोलमुक्ती मिळाल्याचा आनंद शिवसेना आणि भाजपनं ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर साजरा केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज (सोमवारी) सकाळी घोडबंदर रोडवरच पेढे वाटून आनंद साजरा केला. आणि सरकारचं अभिनंदन केलं. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला. रविवारी रात्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही घोडबंदर रोडवर जल्लोष केला.

 हे टोलनाके कायमचे बंद

- वडवळ टोलनाका
अलिबाग – पेण – खोपोली

- शिक्रापूर टोलनाका
वडगाव – चाकण – शिक्रापूर

- मोहोळ टोलनाका
मोहोळ- कुरुल – कामती

- भंडारा टोलनाका
वडगाव – चाकण- शिक्रापूर

- कुसळब टोलनाका
टेंभूर्णी – कुर्डूवाडी – बार्शी – लातूर

- अकोले
अहमदनगर – करमाळा – टेंभुर्णी

- ढकांबे टोलनाका
नांदुरी टोलनाका
सप्तश्रृंगी गड
नाशिक – वणी

- तापी पुलाजवळचा टोलनाका
भुसावळ – यावल – फैजपूर

- रावणटेकडी टोलनाका
खामगाव वळण

– तडाली टोलनाका
रेल्वे ओव्हर ब्रिज, चंद्रपूर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close