सचिन, सौरव आणि लक्ष्मण BCCIच्या क्रिकेट सल्लागार समितीत !

June 1, 2015 3:29 PM0 commentsViews:

sachin ganguli lakshaman01 जून : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण हे भारतीय क्रिकेटमधील तीन दिग्गज आता भारतीय क्रिकेटचे सल्लागार असतील. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आज (सोमवारी) ट्विटरवरुन याबाबत घोषणा केली.

मे महिन्यात झालेल्या बोर्डाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा केली गेली होती आणि आज या तीनही दिग्गज खेळाडूंनी बीसीसीआयचे क्रिकेट सल्लागार होण्यासाठी होकार कळवलाय. या सल्लागार समितीपुढे सर्वात महत्वाचं आणि पहिलं काम म्हणजे भारतीय क्रिकेट टीमसाठी कोचची निवड करणं हे असणार आहे. पुढील आठवड्यात होणार्‍या बांगलादेश दैर्‍यासाठी भारतीय टीम कोचशिवाय असेल. पण त्यानंतर टीमसाठी योग्य कोच निवडण्याची जबाबदारी ही या समितीकडे सोपवण्यात आली आहे. राहुल द्रविड या समितीचा सदस्य असेल अशी शक्यता याअगोदर वर्तवली गेली होती. पण, बोर्डानं द्रविडऐवजी लक्ष्मणला या समितीत संधी दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close