पोलीस निवृत्तीसमारंभात रंगले, दरोडखोर लॉकअप तोडून पळाले

June 1, 2015 4:49 PM0 commentsViews:

sangali police23401 जून : सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस स्टेशनच्या लॉकअपमधून तीन आरोपी पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तासगाव पोलीस स्टेशनचे पीआय रमेश बनकर यांच्या निवृत्तीसमारंभाचा कार्यक्रम रात्री 10 पर्यंत सुरू होता. सर्व पोलीस कर्मचारी या कार्यक्रमात होते त्याचा फायदा घेत कौलं काढून हे आरोपी पळाले.

राहुल माने, राजेंद्र जाधव आणि कुमार पवार अशी आरोपींची नावं आहेत. जबरी चोरीच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. रविवारी रात्री जोरदार पाऊस आला होता आणि वीजही नव्हती, त्याचा फायदा घेत आरोपी पळाल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close