गुजरातमध्ये गायकावर तब्बल साडेचार कोटी उधळले

June 1, 2015 5:18 PM0 commentsViews:

gujrat singer34501 जून : एखाद्या कार्यक्रमात फर्माईश करणं आणि गाणं आवडल्यावर बक्षीस म्हणून पैसे देणं आपण अनेकदा बघतो….गुजरातमधल्या जामनगर जिल्ह्यातल्या कालावाडमध्ये एका कार्यक्रमात कलाकारावर लोकांनी तब्बल साडेचार कोटींची उधळण केलीय.

प्रसिद्ध गायक किर्तीदान गढवी यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात लोकांनी ही पैशांची उधळण केली.

किर्तीदान गात असताना लोक स्टेजवर आले आणि त्यांनी पैशाचा अक्षरश: पैशांचा पाऊस पाडला. दहा रूपयांच्या नोटांपासून ते हजार रूपयांच्या नोटांपर्यंतच्या नव्या कोर्‍या नोटांची ही उधळण होती. पैश्यांच्या या ओंगळवाण्या प्रदर्शनाबद्दल आयोजकांवर चौफेर टीका होतेय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close