हॅपी बर्थ डे डेक्कन क्वीन

June 1, 2015 6:02 PM0 commentsViews:

01 जून :  मुंबई-पुणे प्रवास करणारी डेक्कन क्वीन आज 85 वर्षांची झाली. पुणे स्टेशनमध्ये आज प्रवाशांनी हा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. प्रवाशांनी केक कापून या दख्खनच्या राणीवरचं प्रेम व्यक्त केलं. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. दर वर्ष प्रवासी संघटनेच्या वतीनं हा वाढदिवस साजरा करण्यात येतो.पुणे मुंबई रोज प्रवास अनेक प्रवासी डेक्कन क्वीननं प्रवास करतात. त्यांच्यासाठी आजचा दिवस मोठा आहे. या गाडीतली डायनिंग कार आज मुंबईत पुन्हा बसवण्यात येईल. काही महिन्यांपूर्वी पँट्री कार काढण्यात आली होती. पण प्रवाशांची मागणी पाहता रेल्वेनं पुन्हा डायनिंग पँट्री जोडण्याचा निर्णय घेतला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close