काँग्रेसपेक्षा अधिक वजनदार मंत्रिपदं राष्ट्रवादीनं लाटली

November 6, 2009 9:45 AM0 commentsViews: 1

6 नोव्हेंबर निवडणुकीत काँग्रेसला 20 जागा जास्त मिळूनही मंत्रिमडंळावर राष्ट्रवादीचा वरचष्मा राहणार आहे. कारण बहुतेक वजनदार आणि मलाईदार खाती राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पदरात पाडून घेतल्याचं दिसतं आहे. काँग्रेसला मुख्यमंत्रीपदासह 23 मंत्रीपद सोडताना राष्ट्रवादीनं 20 मंत्रिपदांवर समाधान मानल्याचं दाखवलं. पण खरं पाहायलं तर राष्ट्रवादीनं 1999 च्या तुलनेत फक्त आरोग्य खातंच गमावलं आहे. 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात राष्ट्रवादीने काँग्रेसकडून वन, पर्यावरण आणि आरोग्य ही तीन खाती आपल्याकडे खेचली होती. म्हणजेच मावळत्या सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे असलेली ही खाती काँग्रेसला सुटली होती. अद्यापही दोन्ही काँग्रेसमध्ये काही मुद्यावर मतभेद आहेत. काँग्रेसला अजूनही एखाद-दुसरं मलाईदार खातं राष्ट्रवादीकडून हवंय. विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला सोडल्यानं काँग्रेस हा दावा करत आहे.

close