आता मित्रपक्षांवरून मतभेद

November 6, 2009 9:47 AM0 commentsViews:

6 नोव्हेंबर काँग्रेस-राष्ट्रवादीने मंत्रिमंडळात कोणाला सामिल करावे यावरून वाद सुरू झाला आहे. जनसुराज्य शक्तीला मंत्रिमंडळात स्थान द्यायला काँग्रेस राजी नाही. तर हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला राष्ट्रवादीने विरोध केला आहे. दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश करु नये, अशी आग्रही भूमिका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी घेतली आहे. त्यांच्या या आग्रहाची दखल राष्ट्रवादीने घ्यावी असं काँग्रेसला वाटतंय. वरकरणी एकत्र आल्याचं दाखवणारे हे पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत हेच यातून स्पष्ट होतं.

close