बेशिस्त, बेदरकार वाहनचालकांचे पाठवा फोटो आणि व्हिडिओ!

June 1, 2015 10:46 PM0 commentsViews:

road sefty3401 जून : गल्ली असो, रस्ते असो अथवा महामार्ग…सर्व काही आपल्या मालकीचे समजून बेदरकारपणे वाहनं चालवून अनेक महाभाग अपघातांना कारणीभूत ठरतात. यांच्या अशा बेफिकीर वागण्यामुळे लोकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. गेल्या वर्षभरात महामार्गावर होणार्‍या अपघातांत 1 लाख 36 लोकांचा बळी गेलाय. त्यामुळेच आम्ही अशा बेशिस्त आणि बेदरकारपणे वाहनं चालवणार्‍या वाहनचालकांना आवर घालण्याचा प्रयत्न करतोय…यासाठी हवीय तुमची मदत… तुम्हाला फक्त एवढंच करायचंय… तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कुणी रस्ते सुरक्षा आणि नियमांचं उल्लंघन करत असेल, उजव्या बाजूनं जाणारी अवजड वाहनं असतील किंवा दुभाजकाचा नियम मोडून वाहनं दामटत असतील… तर त्यांचा फोटो अथवा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून आम्हाला पाठवा व्हॉट्सऍपवर…आम्ही तो दाखवू आयबीएन लोकमतवर आणि विचारू प्रशासनाला जाब… चला तर मग रस्ते अपघात कमी करण्यास लावू हातभार…

फोटो आणि व्हिडिओ कुठे पाठवाल?

या क्रमांकावर करा व्हॉट्सऍप- 9167678594

किंवा @ibnlokmattv वर फोटो ट्विट करू शकता

अधिक अपडेटसाठी वापरा #सुरक्षेचामहामार्ग

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close