काळबादेवी आगीचा अहवाल जनतेसाठी खुला होणार -मुख्यमंत्री

June 2, 2015 1:58 PM0 commentsViews:

CM on Fire02 जून : मुंबईतल्या काळबादेवी इथं लागलेल्या भीषण आगीचा अहवाल आता जनतेसाठी खुला होणार आहे. हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी ट्विटही केलंय. अग्निशमन दलात आधुनिकीकरण होणार असून अनेक सुधारणा करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच काळबादेवी आगीचा अहवाल जनतेसाठी खुले करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close