‘जेट’ आणि ‘किंगफिशर’चा प्रवास महागला

November 6, 2009 1:24 PM0 commentsViews: 5

6 नोव्हेंबर जेट आणि किंगफिशर या दोन खाजगी एअरलाईन्सनी तिकिटांच्या दरांत 200 रुपयांनी वाढ केली आहे. हवाई इंधनाच्या दरात वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात येणार असल्याचं जेटने सांगितलं. जेटने त्यांच्या जेट लाईट आणि जेट कोनेक्टच्या सगळ्या तिकीटदरांत ही वाढ केली आहे. तर किंगफिशरने 1 हजार किलोमीटरच्या देशांतर्गत प्रवासासाठी 100 रुपये तर त्यापुढच्या प्रवासासाठी 200 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

close