कासव तस्कारांच्या मुसक्या आवळल्या, 100 कासवं जप्त

June 2, 2015 4:09 PM0 commentsViews:

nagpur kasava02 जून : नागपूरमध्ये पोलिसांनी कासवं तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तस्करांकडून जवळपास शंभर कासवं जप्त केली आहेत.

नवी दिल्लीवरून पाँडिचेरी एक्स्प्रेसमधून दोन जण कासवांची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केली.

नागपूर रेल्वे स्टेशनवरून शिवकुमार शिद्दरांगू आणि प्रभातबिहारी चंद्राबाबू यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल एक हजार कासवं जप्त करण्यात आली आहे.

यातल्या काही कासवांचा गुदमरून मृत्यू झाला. तर उरलेल्या कासवांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close