रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये कपात, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता

June 2, 2015 5:52 PM0 commentsViews:

rbi_new202 जून : रिझर्व्ह बँकेने आपलं तिमाही पतधोरण जाहीर केलंय. आरबीआयने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केलीये. रेपो रेट आता 7.25 टक्क्यावर आला आहे. त्यामुळे गृहकर्ज सुलभ होण्याची शक्यता आहे. रेपो रेट म्हणजे ज्या दरानं बँका रिझर्व बँकेकडून कर्ज घेतात, तो दर म्हणजे रेपो रेट. रिझर्व्हे बँकेनं रेपो रेट कमी केल्यामुळे बँकाही आपल्या कर्ज योजनेत कपात करू शकते. तसंच कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच सीआरआर 4 टक्क्यांवरच स्थिर ठेवण्यात आला आहे. महागाईचा दर जानेवारी 2016 पर्यंत 6 टक्क्यांवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेअर बाजार गडगडला

रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये कपात केली, आणि त्याचा परिणाम म्हणजे सेन्सेक्स 600 पॉईंटनी गडगडला. आज क्रेडिट पॉलिसी जाहीर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम रामन यांनी मान्सूनबद्दल चिंता व्यक्त केली होती. सरासरीच्या 88 टक्के एवढाच पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडणार असेल तर दुष्काळाची भीती असते. याचाच अर्थ अन्नधान्याच्या उत्पादनात येत्या वर्षात घट होणार ही चिंता स्टॉक मार्केटमध्ये पसरली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close