सिंघम ‘हॉकी कॉप’ आता शेती करणार !

June 2, 2015 10:28 PM0 commentsViews:

02 जून : मुंबईत बार, पब संस्कृतीचा डाव उधळवून लावणारे, अनधिकृत फेरीवालांना हुसकवून लावणारे पोलीस उपायुक्त वसंत ढोबळे आता निवृत्त झालेत आणि आता ‘हॉकीस्टिक’ पकडणारे त्यांचे हात चक्क नांगर पकडणार आहेत. निवृत्तीनंतर वसंत ढोबळे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतलाय.

रविवारी वसंत ढोबळे निवृत्त झाले आणि आज थेट आपल्या गावी पोहचलेत. ते थेट शेतात पोहचले आणि रमले सुद्धा…पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) या जन्मगावी निवृत्तीनंतर ते शेती करणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय. तसंच जन्मगाव आणि वंचित महिला आणि मुलांसाठी काम करणार असल्याचंही वसंत ढोबळे यंानी सांगितलं.vasant dhoble44

विशेष म्हणजे, 2013 साली वसंत ढोबळे हे क्राईम ब्रँचमध्ये समाजसेवा शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त असताना त्यांनी उशिरापर्यंत चालणार्‍या बारवर कारवाई केली होती. बारचं नव्हे तर पब, वेशा व्यवसाय चालवणारे दलाल तसंच बालकामगार ठेवणार्‍या मालकांवर कारवाई केली होती. ढोबळे यांनी जेव्हा रात्रभर चालणार्‍या पब, बारवर कारवाई केली होती. तेव्हा ते हॉकी स्टीक घेऊन प्रवेश करत होते. काही पब आणि बारची त्यांनी तोडफोडही केली होती. एवढंच तळीरामांना प्रसादही दिला होता.

त्यामुळे उच्चवर्गीयांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. ‘हॉकी कॉप’ अशी ओळखच त्यांना देण्यात आली होती. त्यांच्या कारवाईमुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आणि त्यांना वाकोला विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपद सोपवण्यात आलं. मात्र, या ठिकाणी आल्यावर ही त्यांची कारवाई सुरुच होती. अनधिकृत फेरीवाल्यांना ढोबळेंनी पिटाळून लावले होते. त्यांच्या कारवाईच्या धसक्यामुळे एका फेरीवाल्याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे तिथूनही त्यांची बदली करण्यात आली. दोन वर्ष मुंबईच्या मुख्य पोलीस कंट्रोल रूममध्ये सेवा केल्यानंतर ढोबळे आता निवृत्त झाले. अलीकडे रिलीज झालेल्या ‘अब तक छप्पन-2′ मध्ये नाना पाटेकर प्रमाणेच हा जिगरबाज ‘सिंघम’ अधिकारी शेती करताना दिसलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close