पालिका नरमली, प्रभा अत्रे म्हणतील तिथे पुरस्कार देण्यास तयार !

June 3, 2015 2:33 PM0 commentsViews:

pune mnp atr303 जून : ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या पुरस्कारावरुन झालेल्या वादानंतर आता मात्र महापालिकेने प्रभा अत्रे म्हणतील तिथे आणि तेव्हा आम्ही पुरस्कार देऊ अशी मवाळ भूमिका घेतली आहे. झालेल्या प्रकारानंतर महापौरांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.

प्रभा अत्रेंना महापालिकेने दोन वर्षांपूर्वी स्वरभास्कर पुरस्कार जाहीर केला होता. पण तो वितरीत केला नव्हता. प्रभा अत्रेंनी घातलेल्या अटींमुळेच हे झाल्याचं महापौरांनी म्हणलं होतं. पण या संपुर्ण प्रकरणाबद्दल आता दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या घरी जाऊनही पुरस्कार देण्याची तयारी असल्याचं पत्रं महापालिकेने पाठवलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close