कॅनडात सिगारेट कंपन्यांना दणका, तब्बल 12 अब्ज डॉलर्सचा दंड

June 3, 2015 12:10 PM0 commentsViews:

canda cigratte303 जून : ‘धुम्रपान पान करना मना है’ अशा सुचना सार्वजनिक ठिकाणी पाहण्यास मिळतात. पण, धुम्रपानला कारणीभूत ठरणार्‍या कंपन्यांना कॅनडामध्ये तब्बल 12 अब्ज डॉलर्स दंड ठोठावण्यात आलाय. कॅनडामध्ये एका खटल्यामध्ये न्यायाधीशांनी 3 तंबाखू कंपन्यांना तब्बल 12 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावलाय.

कॅनडामध्ये आतापर्यंतचा हा सर्वाधिक दंड समजला जातोय. त्यापैकी 80 कोटी डॉलर्स येत्या 2 महिन्यांमध्ये फिर्यादींना द्यायचे आहेत. जेटीआय मॅकडोनाल्ड, इम्पेरियल टोबॅको अँड रोथमन्स, बेन्सन अँड हेजेस अशा तगड्या कंपन्यांना कोर्टानं हा दणका दिलाय. सिगारेट ओढणार्‍या काही जणांनी या कंपन्यांविरोधात फिर्याद केली होती की, या कंपन्यांची सिगारेट ओढून आम्ही आजारी पडलो आहोत आणि आम्ही सिगारेट ओढणं थांबवूही शकत नाही. त्यानंतर कोर्टाने हा ऐतिहासिक निकाल दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close