दिल्लीत पेट्रोल टँकरला भीषण आग, जीवितहानी नाही

June 3, 2015 4:04 PM0 commentsViews:

delhi tank03 जून : दिल्लीतल्या पंजाबी बाग भागात एका पेट्रोल टँकरनं अचानक पेट घेतला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. टँकरने पेट घेतल्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.

या आगीनं आजूबाजूच्या इमारतींनाही काही वेळ धोका निर्माण झाला होता. पंजाबी बाग भागात ट्रांसपोर्ट नगर आहे, तिथे ही घटना घडली.

अग्निशमन दलाचे बंब तातडीनं घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. मात्र, पेट्रोलच्या टँकरने पेट का घेतला याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close