दिल्लीत मॅगीवर बंदी, बिग बाजारमध्ये विक्री बंद

June 3, 2015 4:15 PM0 commentsViews:

magi ban in big bazar03 जून : देशभरात आता मॅगीवर संक्रात आलीये. राजधानी दिल्लीत चाचणीत दोषी आढळल्यानंतर आता दिल्ली सरकार मॅगीचा नवीन माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतलाय. एवढंच नाहीतर बिग बाजारनेही मॅगीवर बंदी घातलीय. यापुढे मॅगीचा माल खरेदी करणार नाही असा निर्णयच बिग बाजारने जाहीर केलाय. त्यामुळे बीग बाजारमध्येही मॅगी मिळणार नाहीय.

आता महाराष्ट्रातसुद्धा आता मॅगीची चाचणी सुरू झालेली आहे. राज्यभरातून मॅगीचे 15 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. एफडीएचा हा रिपोर्ट शुक्रवारी येईल, अशी माहिती एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी दिलीय. मंगळवारी दिल्लीत मॅगीची चाचणी घेण्यात आलीय. यासाठी 13 सॅम्पल निवडण्यात आले होते. 13 पैकी 10 सॅम्पलमध्ये लिड (शिशं) प्रमाणापेक्षा जास्त आढळलं. केरळ आणि हरियाणामध्येही मॅगीवर बंदी घालण्यात आलीये. सर्व सरकारी दुकानांतून मॅगी मागे घेण्यात आलीये. मॅगीची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा अडचणीत सापडले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close