मॅगीची जाहिरात करणं 2 वर्षांपूर्वीच थांबवलं -अमिताभ बच्चन

June 3, 2015 5:02 PM0 commentsViews:

big b on maggi303 जून : मॅगीची जाहिरात केल्यामुळे बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चनही अडचणीत सापडलाय. पण, आपण दोन वर्षांपूर्वीच मॅगीची जाहिरात करणं थांबवलं होतं असा खुलासा अमिताभ बच्चन यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. तसंच या प्रकरणी अधिकार्‍यांकडून कोणतीही नोटीस मिळाली नाही. जर नोटीस मिळाली तर नक्की सहकार्य करू असंही बिग बी म्हणाले.

त्यापूर्वी माधुरी दीक्षितनेही ट्विट करून मॅगीबद्दल खुलासा केलाय. माधुरी म्हणते, “मी नेस्लेच्या टीमची भेट घेतली. आम्ही दर्जा आणि सुरक्षेच्या कडक चाचण्या करतो, आणि गिर्‍हाईक आमची पहिली प्राथमिकता आहे, असं ते मला म्हणाले. मी अनेक वर्षांपासून मॅगी खातेय. सध्या जे सुरू आहे त्याबाबत मलाही चिंता वाटली.” विशेष म्हणजे माधुरीला हरिद्वार अन्न सुरक्षा विभागाने नोटीस बजावलीये त्यानंतर माधुरीने खुलासा केलाय.

किंग खान शाहरूख खानने महिन्याभरापूर्वी ब्रँडबद्दल आपली भूमिका मांडली होती. जाहिरात करण्यापूर्वी आम्ही उत्पादनाची माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न करतो. पण, यातील तांत्रिक बाबी लक्षाीत येत नाही. प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी सेलिब्रिटींनी अशा उत्पादनाची जाहिरात करताना केमिकलची माहिती घ्यावी असा सल्ला दिलाय.

ऍडगुरू एलिक पद्मसी यांनी सेलिब्रिटींची पाठराखण केलीये. कोणत्याही उत्पादनाच्या ब्रँड ऍम्बॅसेडरला नोटीस पाठवण्याचा अधिकार सरकारी विभागाला नाहीये. जर त्यांना नोटीस पाठवायची असेल तर उत्पादक कंपन्यांना पाठवावी असं परखड मत नोंदवलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close