मुंबई-गोवा महामार्ग दोन वर्षांत पूर्ण करू -गडकरी

June 3, 2015 6:24 PM0 commentsViews:

nitin gadkari03 जून : आयबीएन लोकमतने महामार्ग सुरक्षा मोहीम हाती घेतलीय. या मोहिमेत आम्ही मुंबई-गोवा महामार्गाचा विषयसुद्धा लावून धरला. आता हा मुंबई-गोवा महामार्ग दोन वर्षांत पूर्ण करू, असं आश्वासन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेलं आहे.

मुंबई गोवा महामार्गाबाबत बैठक झाल्याचं गडकरींनी सांगितलं. या महामार्गासाठी अनेक ठिकाणी भूसंपादन आणि मोबदल्याबाबत वाद आहेत. त्यावर लवकर तोडगा निघेल, असंही गडकरी यांनी म्हटलंय. मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या चार वर्षांपासून रखडलंय.

दरम्यान, मुंबई – गोवा हायवेच्या चौपदरीकरणासाठी करण्यात येणार्‍या मोजणीला काँग्रेसचे नेते नितेश राणेंच्या कणकवली मतदारसंघात विरोध होतोय. आज साळीस्ते गावात नितेश राणेंच्या कार्यकर्त्यानी मोजणी बंद पाडली. भूसंपादनासाठी असमान मोजणी आम्हाला मान्य नाही, जमीन धारकांना आधी नोटीसा बजावल्याशिवाय आणि मोबदला किती मिळणार हे सांगितल्याशिवाय ही मोजणी होऊ देणार नाही , असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close