मुंबई पालिकेकडून अवहेलना, शहीद नेसरीकरांच्या कुटुंबियांना घर खाली करण्याचे आदेश ?

June 3, 2015 6:35 PM0 commentsViews:

sunlil nesrikar03 जून : मुंबईतील काळबादेवी अग्नितांडवात अग्निशमन दलाचे चार जिगरबाज अधिकारी गमावले. आगीच्या दुर्घटनेत पहिल्यांदाच चारह अधिकारी बळी पडल्यामुळे हळहळ व्यक्त होतं आहे. मात्र, मुंबई महापालिका याला अपवाद ठरलीये. मुंबई पालिकेनं शहीद सुनील नेसरीकर यांच्या कुटुंबियांना घर खाली करण्याचे आदेश दिल्याची बाब उजेडात आलीये.

शहीद झालेल्या मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्या कुंटुबियांना घर खाली करण्यासाठी पालिकेंन सूचना केल्याचं उघड झालंय. नेसरीकर यांचं निधन होऊन केवळ 11 दिवस उलटले आहेत, त्यातच पालिकेच्या या कृतीबद्दल संताप उमटत आहे.

काही दिवसापूर्वी पालिकेच्या अधिकार्‍यांनी घरी येवून घर सोडण्याच्या सूचना दिल्याची माहिती नेसरीकरांच्या नातेवाईकांनी दिलीय.

विशेष म्हणजे, राज्य सरकारने शहीद अधिकार्‍यांच्या कुटुंबियांना घरं देण्याचं आश्वासन दिलंय. पण, पालिकेच्या अधिकार्‍यांनी शहिदांच्या कुटुंबियांना घरं खाली करण्याचे आदेश दिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close