राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची गुंडगिरी, आश्रमाची केली तोडफोड

June 3, 2015 9:58 PM0 commentsViews:

ashish damle badlapur303 जून : बदलापूरमध्ये सुरक्षा रक्षकांच्याच उपस्थितीत राष्ट्रवादीचे नगरसेवक कॅप्टन आशिष दामले याने एका आश्रमाात तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. तोडफोडीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय. या प्रकरणी आशिष दामलेवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दामलेला शोधण्यासाठी बदलापूर पोलिसांची पथक रवाना झाली आहेत.

बदलापूरपासून जवळ असलेल्या ईनगावमध्ये नरेश रत्नाकर यांचे आश्रम आहे. या आश्रमातच मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास 20-25 कार्यकर्त्यांसह दामले घुसले. आणि त्यांनी आश्रमावर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर घराच्या खिडकीचे गज वाकवत ते घरात शिरले या वेळी रत्नाकर यांच्याकडे स्वरक्षणासाठी असलेली बंदूक हिसकावून घेतली. तसंच दामलेंनी धमकावल्याचा आरोप ही रत्नाकर यांनी केलाय.

विशेष म्हणजे, हा प्रकार घडला त्यावेळी दामले यांच्या सुरक्षेत असलेले दोन पोलीसही त्यांच्यासोबत होते. दामले 1 लाख रुपये घेऊन गेल्याचा आरोपही रत्नाकर यांनी केलाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. या प्रकरणी दामलेविरोधात धमकावणं, घराची तोडफोड करणं, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार असे गुन्हे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दामले फरार झाला असून पोलीस शोध घेत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close