डेव्ह वॉटमोर कोलकाता नाईट रायडर्सचे नवे कोच

November 6, 2009 1:51 PM0 commentsViews: 6

6 नोव्हंबर कोलकाता नाईट रायडर्सचे नवे कोच म्हणून डेव्ह व्हॅटमोर यांच्या नावाची अधिकृत घोषणा शुक्रवारी करण्यात आली. शिवाय कप्टनपदी सौरव गांगुलीलाच कायम ठेवण्यात आलं आहे. पहिल्याच आयपीएल हंगामात कोलकाता टीमचे तेव्हाचे कोच जॉन बुकानन आणि कॅप्टन सौरव गांगुली यांचं आपापसात जमत नव्हतं. मीडियानेही हा वाद चांगलाच चघळला होता. त्यानंतर टीम मॅनेजमेंटने बुकानन यांची कोचपदावरुन उचलबांगडी केली होती. त्यानंतर रिचर्ड पायबस आणि जेफरी बॉयकॉट यांच्या नावाची चर्चा कोलकाता टीमचे कोच म्हणून होत होती. पण अखेर डेव्ह व्हॅटमोर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

close