170 आमदारांसह आघाडीचा सरकार स्थापनेचा दावा

November 6, 2009 2:01 PM0 commentsViews: 1

6 नोव्हेंबर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. आघाडीचे 144, अपक्ष आणि इतर छोटे-मोठे पक्ष मिळून 170 आमदारांचा सरकारला पाठिंबा असल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. राजभवनावर राज्यपालांना सरकार स्थापनेसंदर्भातलं पाठिंब्याचं पत्र शुक्रवारी आघाडीने सादर केलं. त्यानंतर बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजता आघाडी सरकारचा शपथविधी होणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादीचे 20 मंत्री शपथ घेतील, पण काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी दोन टप्प्यात होणार आहे. काँग्रेस 16 किंवा 18 मंत्रीच शपथ घेतील, उरलेले मंत्री दुसर्‍या टप्प्यात शपथ घेतील, असंही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

close