राष्ट्रवादीची वीस मंत्र्यांची यादी निश्चित

November 7, 2009 8:48 AM0 commentsViews: 6

7 नोव्हेंबर राष्ट्रवादी काँग्रेसची वीस मंत्र्यांची यादी तयार झाली आहे. त्यानुसार पंधरा कॅबिनेट मंत्री शनिवारी शपथ घेतील. यात आर.आर.पाटील, अजित पवार, जयंत पाटील, गणेश नाईक, मनोहर नाईक, विजयकुमार गावित, सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते, जयदत्त क्षीरसागर, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, लक्ष्मण ढोबळे, अनिल देशमुख यांचा समावेश आहे. तर राज्यमंत्री पदासाठी सचिन अहिर, फौजिया खान, भास्कर जाधव, प्रकाश सोळंकी, गुलाबराव देवकर या पाच जणांचा समावेश असेल. काँग्रेस- राष्ट्रवादी मध्ये 23-20 असा फॉर्म्युला निश्चित झाला होता. त्यानुसार राष्ट्रवादीचे सर्व वीस मंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसपेक्षा 20 आमदार कमी निवडून आले असताना देखील, राष्ट्रवादीला दबाव तंत्राचा वापर करून काही महत्वाची खाती आपल्याकडेच ठेवण्यात यश आलंय.

close