सिंहगडावरून बेपत्ता झालेल्या तरुणीचा तपास सुरुच

November 7, 2009 8:51 AM0 commentsViews: 2

7 नोव्हेंबर सिंहगडावरुन गुरूवारी बेपत्ता झालेली तरुणी अजूनही सापडलेली नाही. कविता चिखली ही 28 वर्षांची इंजीनिअर तरुणी सिंहगडावरून बेपत्ता झाली होती. कोरेगाव भीमा इथल्या सेको टूल्स कंपनीत कविता इंजिनिअर आहे. गुरुवारी ती 32 जणांच्या ग्रुपमधून सिंहगडावर ट्रेकिंगला गेली होती. त्यावेळी शॉर्टकटनं गडावर येते, असं कवितानं आपल्या सहकार्‍यांना सांगितलं. पण, नंतर ती दिसलीच नाही. पोलीस आणि गिर्यारोहक पथकानं तिचा कसून शोध घेतला. पण ती अजूनही सापडली नाही. गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून ही तरुणी बेपत्ता आहे. पुणे ग्रामीण पोलीस पथक या तरुणीचा शोध घेत आहेत.

close