आणखी 13 टोलनाके बंद करण्याचे गडकरींचे संकेत

June 3, 2015 10:31 PM0 commentsViews:

gadkari on toll 3403 जून : राज्यात रस्त्यावरील प्रवास आणखी सुखकर होण्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. राज्यात केंद्रसरकारच्या आखत्यारीत असलेले राष्ट्रीय महामार्गावर असलेले 13 टोल नाके टप्प्याने बंद करणार असल्याचे संकेत नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

हे टोल नाके कोणते असतील हे लवकरच राज्यसरकारला जाहीर करणार आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नितीन गडकरींनी आणखी 13 टोल बंद करता येईल असं सुतोवाच केलंय. राज्य सरकारने दोनच दिवसांपूर्वी 1 जूनपासून राज्यातील 13 टोल नाके बंद केले आहे. तसंच 53 टोल नाक्यांवर सूट दिली आहे. आता केंद्राकडून टोलबंद करण्यासाठी हातभार लावला जाण्याची शक्यता आहे.

 हे टोलनाके झाले आहे कायमचे बंद

- वडवळ टोलनाका
अलिबाग – पेण – खोपोली

- शिक्रापूर टोलनाका
वडगाव – चाकण – शिक्रापूर

- मोहोळ टोलनाका
मोहोळ- कुरुल – कामती

- भंडारा टोलनाका
वडगाव – चाकण- शिक्रापूर

- कुसळब टोलनाका
टेंभूर्णी – कुर्डूवाडी – बार्शी – लातूर

- अकोले
अहमदनगर – करमाळा – टेंभुर्णी

- ढकांबे टोलनाका
नांदुरी टोलनाका
सप्तश्रृंगी गड
नाशिक – वणी

- तापी पुलाजवळचा टोलनाका
भुसावळ – यावल – फैजपूर

- रावणटेकडी टोलनाका
खामगाव वळण

– तडाली टोलनाका
रेल्वे ओव्हर ब्रिज, चंद्रपूर

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close