नदाल क्वार्टर फायनलमध्येच फ्रेंच ओपनमधून बाहेर

June 4, 2015 10:20 AM0 commentsViews:

nadal04 जून : क्ले कोर्टाचा बादशाह राफाएल नदालला फ्रेंच ओपनमध्ये मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतून  नदाल बाहेर पडलाय. नोवाक जोकोव्हिचनं नदालचा 7-5, 6-3 आणि 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. नदालनं आतापर्यंत 9 वेळा फ्रेंच ओपन जिंकलेली आहे. या स्पर्धेत नदाल आतापर्यंत 72 मॅचेस खेळलाय आणि त्यापैकी फक्त 2 वेळा त्याला पराभवाला सामोरं जावं लागलंय.

अँडी मरेन- जोकोव्हिच सेमीफानलमध्ये आमनेसामने

तर दुसरीकडे ब्रिटनच्या अँडी मरेनं स्पेनच्या डेव्हिड फेररचा 7-6, 6-2, 5-7 आणि 6-1 असा पराभव करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक मारलीये. सेमी फायनलमध्ये त्याचा सामना नोव्हाक जोकोविकशी होणार आहे. मरेला या स्पर्धेत तिसरं मानांकन मिळालंय. फेररविरोधात पहिले दोन्ही सेट त्यांनं चांगला खेळ केला. मात्र तिसरा सेट त्यानं गमावला. चौथ्या सेटमध्ये मात्र त्यानं फेररला संधीच दिली नाही आणि करियरच्या 16व्या ग्रँड स्लॅम सेमी फायनलमध्ये रुबाबात प्रवेश केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close