लष्करालाही मॅगी नकोशी, घातली बंदी

June 4, 2015 10:24 AM0 commentsViews:

maggi ban in army404 जून : देशभरात मॅगीवर संक्रात आलीय. दिल्ली, हरियाणा, केरळ पाठोपाठ आता लष्करानेही मॅगीवर बंदी घातलीये. त्यामुळे साहजिकच लष्कराच्या कॅन्टीनमध्ये आता मॅगी दिसणार नाही. सीमेवर जवानांसाठीसुद्धा मॅगी मोठा आधार असायची. पण, आता लष्करानेही मॅगीवर पूर्णपणे बंदी घातलीय.

दिल्लीमध्ये झालेल्या चाचणीत मॅगीमध्ये लिड (शिशाचं) प्रमाण जास्त आढळलं. त्यामुळे दिल्ली सरकारने बंदी घातलीये. तसंच बिग बाजारनेही मॅगी न विकण्याचा निर्णय घेतलाय. देशभरात बिगबाजारचे शहराशहरांमध्ये मॅगीचे आऊटलेट्स आहेत. आता या दुकानांमध्येसुद्धा मॅगी मिळणार नाहीय. दिल्ली सरकारसुद्धा मॅगीचा नवीन माल खरेदी करणार नाहीय. तसा निर्णयच दिल्ली सरकारनं घेतलाय. महाराष्ट्रातसुद्धा आता मॅगीची चाचणी सुरू झालेली आहे. राज्यभरातून मॅगीचे 15 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. एफडीएचा हा रिपोर्ट शुक्रवारी येईल, अशी माहिती एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी दिलीय.

या ठिकाणी मॅगीवर बंदी आणि चाचणी

दिल्ली : मॅगीचे 13 पैकी 10 नमुने सदोष आढळले, मॅगीवर 15 दिवसांसाठी बंदी
उत्तर प्रदेश : चाचणीत मॅगी अपायकारक सिद्ध झालंय.
केरळ : सरकारी दुकानांमध्ये मॅगीवर बंदी
गोवा : चाचणीत मॅगी पास, गोव्यात मॅगीवर बंदी नाहीय.
महाराष्ट्र : मॅगीची नव्याने चाचणी होणार, शुक्रवारपर्यंत येणार अहवाल
कर्नाटक : मॅगीची नव्याने चाचणी होणार
हरियाणा : सरकारी दुकानांमध्ये मॅगीवर बंदी, मॅगीची होणार चाचणी
उत्तराखंड : मॅगीची होणार चाचणी
तामिळनाडू : मॅगीची होणार चाचणी
आंध्र प्रदेश : मॅगीची होणार चाचणी
तेलंगणा : मॅगीची होणार चाचणी
गुजरात : मॅगीची होणार चाचणी
ओडिशा : मॅगीची होणार चाचणी
पंजाब : मॅगीची होणार चाचणी
आसाम : मॅगीची होणार चाचणी

मॅगीची जाहिरात करणं आपण 2 वर्षांपूर्वीच थांबवलं – बिग बी

बिग बी अमिताभ बच्चन यांनीहीसुद्धा आज मॅगीच्या या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. मॅगीची जाहिरात करणं आपण 2 वर्षांपूर्वीचथांबवलंय, असं त्यांनी सांगितलंय. तसंच आपल्याला अजून कोणतीही नोटीस मिळालेली नाही आणि नोटीस मिळाल्यावर चौकशीत सहकार्य करणार असं बच्चन यांनी म्हटलंय.

…म्हणूनच मॅगीची जाहिरात केली -माधुरी

नेस्ले इंडियानं मॅगी सुरक्षित असल्याचं आश्वासन दिल्यावरच मी त्याची जाहिरात केली, असा खुलासा अभिनेत्री माधुरी दीक्षितनं केलाय.
माधुरी आपल्या ट्विटमध्ये म्हणते, “मी हल्लीच नेस्लेच्या टीमची भेट घेतली. आम्ही दर्जा आणि सुरक्षेच्या कडक चाचण्या करतो, आणि गिर्‍हाईक आमची पहिली प्राथमिकता आहे, असं ते मला म्हणाले. मी अनेक वर्षांपासून मॅगी खातेय. सध्या जे सुरू आहे त्याबाबत मलाही चिंता वाटली.”

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close