भाकड जनावरांसाठी ‘प्राणी रक्षण मंडळ’ स्थापन करणार -मुख्यमंत्री

June 4, 2015 10:53 AM0 commentsViews:

cm devendra fadanvis404 जून : शेतकर्‍यांना सांभाळ करता येत नसलेल्या भाकड जनावरांच्या संगोपनासाठी राज्य सरकार ‘प्राणी रक्षण मंडळ’ स्थापन करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.

विदर्भातल्या गोरक्षण संस्थांनी अकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘गोवंश हत्याबंदी’ला विरोध करणार्‍या विरोधकांसोबतच इंग्रजी प्रसार माध्यमांवर जोरदार टीका केली. यासोबतच गोवंशाच्या संगोपनासाठी सरकारवर अधिक विसंबून न राहता गोभक्तांनीच समोर यावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close